सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण तर आता “कोरोसेफ” नवा पर्याय
सावंतवाडी
लॉकडाऊन आणि जनताकर्फ्यू वाढला तरी लोकांना वस्तू खरेदीसाठी मुभा दिली जाणार आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.सावंतवाडी व वेंगुर्ला येथे नव्याने कोविड सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे,तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण व्हावे.यासाठी तयारी सुरू आहे,अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात फवारणी करण्यात येणार आहे.त्यासाठी “कोरोसेफ” हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविला जाणार आहे.त्यात बाजार,ऑफीस आदी महत्वाच्या ठीकाणी फवारल्यास तीस दिवसा पर्यंत प्रभाव राहू शकतो.त्यामुळे कुठलाही व्हायरस त्या ठीकाणी येणार नाही.यासाठी आवश्यक निधी देण्यात आला आहे,असे ही केसरकर म्हणाले.