सिंधुदूर्ग जिल्ह्यात रमजान ईद कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी करण्यात आली. कडक निर्बंधांमुळे मुस्लिम बांधवांनी मशीदी ऐवजी घरातच अदा केली. ईद ची नमाज, प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याऐवजी सर्वांनी एकमेकांना शोशल मिडिया द्वारे शुभेच्छा देत ईद साजरी केली. ईद निमित्त सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींनी तसेच अधिका-यांनी मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.
कोरोनामुळे सलग दोन वर्षे ईद घरीच अदा करावी लागली आहे. ईद म्हणजे उत्साह व आनंदाचा दिवस. परंतु कोरोनामुळे ईद सह सर्वच सणांवर विरजण पडले आहे. ईद चे खास आकर्षण असते ते म्हणजे छोटे रोजदारांचे. यंदा ही शेकडो लहान मुलांनी रमजान चे सर्व तीस रोजे पुर्ण केल्याने त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.