ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांचा आरोग्य प्रशासनाला इशारा
वैभववाडी
तालुका वैद्यकीय अधिकारी यांना 15 मार्च 2021 रोजी Covid-19 लसीकरण सुरू करणे बाबत दिलेले निवेदन व तहसीलदार कार्यालय,आरोग्य विभागाला 3 मे 2021 रोजीचे प्रा.आ.केंद्र सडूरेला कायमस्वरूपी रुग्णवाहिका देणेबाबत दिलेल्या निवेदनचा संदर्भ देत ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी तालुका आरोग्य विभागाचे निवेदनाद्वारे 13 मे 2021 रोजी व्हाट्सअप मेल द्वारे तर 14 मे 2021 रोजी प्रत्यक्ष भेटून पुन्हा लक्ष वेधले आहे. काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की या दोन्ही विषयासंदर्भात वारंवार तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित विभागाशी फोनवरून, व्हाट्सअपच्या माध्यमातून पाठपुरावा करून देखील अद्याप हे लसीकरण केंद्र सडुरे मध्ये सुरू झालेल दिसत नाही. या संदर्भात तहसीलदार कार्यालयाला देखील 03 मे 2021 रोजी निवेदनाद्वारे सूचित केले होते. त्याचप्रमाणे 03 मे रोजी या निवेदनात कायमस्वरूपी रुग्णवाहिका देण्याची देखील मागणी केली होती. पंचक्रोशीतील सडुरे प्राथमिक आरोग्य केंद्रावर सडूरे सहीत शिराळे, कुर्ली, अरूळे, निम अरूळे, सांगुळवाडी, नावळे ही गावे आरोग्यसेवा घेत आहेत.Covid-19 लसीकरण केंद्र तालुका स्तरावर चालू असल्यामुळे व जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, संचारबंदी असल्यामुळे ग्रामस्थांना तालुकास्तरावर लसीकरणासाठी येण्यास अडचण निर्माण होत आहे.तसेच या प्रा.आ.केंद्रावर रुग्णवाहीका मिळणे अत्यंत गरजेचे होते. या दोन्ही मागण्या पुर्ण हॊण्यासाठी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील सदर विषयाकडे सर्वांचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येते. तसेच विनंत्या, शिष्टाई करुन देखील पंचक्रोशितिल जनतेला न्याय मिळत नसेल तर नाविलाजास्तव मला पंचक्रोशीतील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेलं असा सूचक इशारा काळे यांनी दिला आहे. सडूरे प्रा.आ. येथे Covid 19 लसीकरण केंद्र सुरु करण्यास जागा उपलब्द करुन देण्यास ग्रामपंचायत स्थरावरुन मी स्वतः लागेल ते सहकार्य करेन पण जर तालुका तहसीलदार तसेच तालुका आरोग्य विभाग यांच्याकडून आठ दिवसाच्याआत प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे येथे Covid-19 लसीकरण चालू न झाल्यास व कायमस्वरूपी रुग्णवाहिका न मिळाल्यास,वैभववाडी तालुका तहसील कार्यालयाच्या समोर मी नवलराज विजयसिंह काळे ग्रा.प.सदस्य सडुरे शिराळे पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने शुक्रवार दिनांक 21 मे 2021 रोजी तालुका आरोग्य विभागाचे लक्ष वेधण्याकरिता कोरोना संदर्भतील सर्व नियमचे पालन करुन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार, या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संबंधित विभाग जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असे काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. [vsrp vsrp_id=”” class=””]या निवेदनाच्या प्रती तालुका तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक वैभववाडी पोलीस स्टेशन, सरपंच/ग्रामसेवक ग्रामपंचायत सडूरे शिराळे यांच्याकडे 13 मे ला व्हाट्सअप मेल द्वारे तर 14 मे प्रत्यक्ष भेटून प्रतीत दिले आहेत.