गोवा खंडपीठाचे सरकारला निर्देश
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात पहाटे 2 ते 6 वा. या दरम्यान होणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू रोखण्यास राज्य प्रशासनाने डुरा सिलिंडर्स, तज्ज्ञ ट्रॅक्टर चालक, 323 प्राणवायू कॉन्संट्रेटर्स उपलब्ध करण्याबरोबरच प्राणवायू (Oxygen) साठा टाकी बसविण्याचे काम सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या कामाचा आढावा अहवाल उद्या 14 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आरोग्य सचिव रवी धवन यांनी सादर करावा. हा अहवाल समाधानकारक असल्यास सुनावणी येत्या सोमवारी (17 मे) घेतली जाईल व अहवाल असमाधानकारक नसल्यास किंवा त्यात आणखी निर्देश देण्याची आवश्यकता असल्यास शनिवारी (15मे) सुनावणी घेतली जाईल असे संकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले.
गोमेकॉ इस्पितळात पहाटे 2 ते 6 वा. या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यूचे प्रमाण अधिक आहे याची गंभीर दखल घेऊन काल गोवा खंडपीठाने सरकारी यंत्रणा तसेच प्राणवायू पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना वेळेत प्राणवायू सिलिंडर्स पुरवठा करण्याचे निर्देश देऊन व एकही मृत्यू या काळात नोंद होणार नाही यासाठी प्रयत्न करूनही 40 पैकी 15 रुग्णांचा पहाटे 2 ते 6 या काळात मृत्यू झाला. हे प्रयत्न अपयशी ठरले याबाबत दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सुनावणीच्या सुरुवातीला गोवा खंडपीठाने मत व्यक्त केले. या मृत्यसाठीची कारणे आज खंडपीठासमोर मांडण्यात आली. त्यामध्ये प्राणवायूचे ट्रॉलवरील सिलिंडर्स संपल्यानंतर दुसरी ट्रॉली लावताना वेळ जातो त्यावेळी प्राणवायू पुरवठा होणार दाब कमी होतो. ट्रॉली चालकाला ही सिलिंडर्सची ट्रॉली मागे रिव्हर्समध्ये घेताना बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे सिलिंडर्सचे कनेक्शन होण्यासही उशीर होतो. तंत्रज्ञान असतात मात्र हे काम हाताने करावे लागते. मात्र ही कारणे मृत्यू होण्यास जबाबदार असल्याने प्रशासनाने त्यावर त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.
प्राणवायूअभवा गोमेकॉ इस्पितळासह इतर कोणत्याच इस्पितळात कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालेला नाही असे सरकारने स्पष्ट केले व राज्य सरकारने केंद्राकडून येणाऱ्या प्राणवायूच्या साठ्यात वाढ करण्याची मागणी केली आहे व त्याचा आढावा घेण्यात येत असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारनेही हा प्राणवायूचा वाढीवा साठा लवकरात लवकर राज्याला द्यावा असे निर्देश गोवा खंडपीठाने दिले. प्राणवायू सिलिंडर्सची ट्रॉलीवरून वाहतूक करताना, ट्रॉलीचे कनेक्शन करताना तसेच ट्रॅक्टर चालकाला ही ट्रॉली कनेक्शनच्या ठिकाणी नेताना असलेल्या कमी जागेमुळे अडचणी येत असल्याने प्राणवायू पुरवठ्यास विलंब होतो. यावर सरकारने योग्य तोडगा काढावा जेणेकरून या त्रुटीमुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना सुरळीत प्राणवायू पुरवठा करून त्यांना किंमती जीवनाला मुकावे लागणार नाही.