You are currently viewing माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील 4 लाख 53 हजार 884 व्यक्तीचे सर्वेक्षण

माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील 4 लाख 53 हजार 884 व्यक्तीचे सर्वेक्षण

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड रुग्णाची वाढती संख्या व कोविड रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याने कोविड प्रतिबंधात्मक व नियंणात्मक कार्यवाही जनतेच्या सहभागातून करणेसाठी जिल्ह्यामध्ये माझे   कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेच्या धर्तीवर माझा सिधुदुर्ग – माझी  जबाबदारी ही मोहीम दिनांक ५ मे २०२१ ते १४ मे २०२१ या कालावधीमध्ये   राबविण्यात येत आहे. मोहिम कालावधीमध्ये गृह भेटी देण्यासाठी पुढीलप्रमाणे ६५० आरोग्य पथके तयार करण्यात आलेली आहेत.  एका पथकामध्ये १ आशा स्वयसेविका आणि १ प्राथमिक शिक्षकाचा समावेश आहे. वैभववाडी -३८, कुडाळ -१२५, कणकवली -९७, वेंगुर्ला-५६, देवगड-१०७, सावंतवाडी- १००, मालवण -८४, दोडामार्ग -४३, पथक दरोरोज ४० घरांना भेटी देत आहे.

       भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान SPO२ तपासणे व comorbid condition  आहे का याची माहिती घेण्यात येत आहे. ताप, खोकला, दम लागणे, SPO२ कमी अशी कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्यां व्यक्तींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सदर्भित करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामण्ये कोविड -१९ प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जात आहेत. तरी आज अखेरपर्यत पुढीलप्रमाणे तालुका निहाय सर्वेक्षण जिल्ह्यातील सर्व आरोग्य पथकांनी पुर्ण केलेले  आहे. सर्वेक्षण  करतेवेळी ILI व SARI आजारी असलेले रुग्ण आढळलेले आहेत.

माझा सिंधुदुर्ग  माझी जबाबदारी मोहिमेंतर्गंत जिल्हयतील  प्रत्येक गाव, वस्त्या,वाडी यातील प्रत्येक नागरीकाची आरोग्य तपासणी, कोमॉर्बीड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरीकास भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. मोहिमेध्ये कोमॉर्बीड रुग्ण सापडलेले आहेत.

कोमॉर्बीड condition असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली जात आहे आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीसाठी संदर्भित केले जात आहे. कोमॉर्बीड रुग्णांच्या उपचारासाठी मधुमेंह , उच्च रक्तदाब, ह्दयविकार, किडनी विकार इ आजारासाठी प्रोटोकॉलनुसार लागणाऱ्या  औषधाचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालय स्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. साठा कमी असल्यास NHM च्या FREE MEDICINE निधीतून खरेदी करण्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. मोहिमेदरम्यान घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री-कोविड, कोविड आण पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगितले जात आहेत. तसेच परजिल्ह्यातून , परराज्यातून , परदेशातून आलेल्या १३ हजार७०४ नागरिकांना गृह विलगीकरणासाठी तसेच लक्षणे आढळून आल्यास स्वॅब तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आलेले आहेत.

              तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दिनांक ५ मे २०२१ ते १४ मे २०२१  या कालावधीतमध्ये कोवीड नियंत्रणासाठी माझा सिंधुदुर्ग – माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभाग घेतल्याबद्दल डॉ.महेश खलिपे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा  परिषद  सिंधुदुर्ग यांनी आभार मानलेले आहेत. तसेच होणाऱ्या पुढील सर्वेक्षणासामध्ये सहभागी होण्यासाठी व मोहिम उत्तमरित्या राबविण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीन आवाहन करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा