You are currently viewing जिल्ह्यात 1 लाख 19 हजार जणांनी घेतला पहिला डोस

जिल्ह्यात 1 लाख 19 हजार जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी

वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 19 हजार 518 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 9 हजार 462 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 554 जणांनी दुसरा डोस घेतला.  7 हजार 617 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 3 हजार 923 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 51 हजार 885 व्यक्तींनी पहिला डोस तर 19 हजार 335 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 38 हजार 102 नागरिकांनी पहिला डोस तर 4 हजार 130 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.  18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 53 हजार 460 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 63 हजार 930 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 27 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 36 हजार 450 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 18 हजार 151 कोविशिल्ड आणि 35 हजार 309 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 53 हजार 460 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 1 हजार 720 लसी असून त्यापैकी 1 हजार 560 कोविशिल्डच्या तर 160 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 10 हजार 800 कोविशिल्डच्या लसी शिल्लक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा