You are currently viewing परबवाडा उपआरोग्य केंद्रावर प्रथमच १५० जणांचे लसीकरण

परबवाडा उपआरोग्य केंद्रावर प्रथमच १५० जणांचे लसीकरण

नवीन लसीकरण केंद्र चालू केल्याबाबत नागरिकांत समाधान

वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील ऊभादांडा जि.प.मतदार संघात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने कोरोना लसीकरणात या भागातील सर्व जेष्ठ नागरिकांना तसेच १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना वंचित राहावे लागत होते. या भागातील नागरिकांच्या सोयी सुविधेच्या दृष्टीने आज गुरुवारी पासून शासनामार्फत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. परबवाडा उपकेंद्र लगतच्या परबवाडा शाळा नं. १ व परबवाडा ग्रामपंचायतच्या परिसरात भव्य पटांगण व भव्य हाँलमध्ये शासनाकडून प्राप्त झालेल्या १५० कोवीशिल्डचे लसीकरण शांततेत व गर्दी बोजवारा न होता व्यवस्थित पार पडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा