कणकवली
शहरासह तालुक्यातील बाजारपेठा उद्या दि.१४ पासून सुरू होणार आहेत. मात्र यात अत्यावश्यक सेवेतील दुकानांनाच सकाळी ७ ते ११ यावेळेत दुकाने सुरू करण्याची परवानगी असणार आहे. तसेच दुकाने खुली केल्यानंतर दुकानांत गर्दी होऊ न देणे तसेच सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन व्यावसायिकांनी करावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.
कणकवली तालुक्यात १ ते १० मे या दरम्यान जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात आली. तर जिल्हाधिकार्यांनी १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र कणकवली तालुक्यात आधीपासूनच जनता कर्फ्यू असल्याने तालुक्यातील दुकाने १४ मे पासून उघडण्याची परवानगी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे मागितली होती. त्याला मंजूरी देण्यात आली असल्याने कणकवली शहरासह तालुक्यातील दुकाने उद्या शुक्रवारपासून सुरू करता येणार आहेत.