रुग्णांना दिला जातो घरपोच ऑक्सिजन
कणकवली तरंदळे येथे महिलेवर उपचारा नंतर घरीच ऑक्सिजन लावून दिली जाते सेवा
कणकवली
आमदार नितेश राणे यांची ऑक्सिजन बँक ही संकल्पना कोरोना रुग्णांसाठी “संजीवनी” ठरू लागली आहे. ज्या रुग्णांना उपचार घेऊन घरी आल्यानंतर ऑक्सिजन ची गरज भासते त्यांना घरपोच जंबो ऑक्सिजन दिला जात आहे. कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील महिलेची ऑक्सिजन ची गरज पूर्ण करून या आजारपणातून सवरण्यास मदत केली जात आहे.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी सुरू केलेल्या ऑक्सिजन बँक चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना फारच चांगला उपयोग होऊ लागला आहे. अनेकांचे प्राण वाचले आहेत. खाजगी आणि शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन संपताच रात्री अपरात्री केव्हाही संपर्क साधताच आमदार राणे यांच्याकडून रुग्णापर्यंत ऑक्सिजन पोचविला जातो, आतातर थेट रुग्णांच्या घरी सुद्धा ऑक्सिजन पोहोच करून जीव वाचविले जात आहेत.
कणकवली तालुक्यातील तरंदळे सावंतवाडीतील कोरोनामुक्त झालेली परंतु ऑक्सिजनची गरज असलेल्या सौ.अर्चना अरुण सावंत यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन ऑक्सिजन पुरविण्यात आला यावेळी सावंत कुटुंबीयांनी आमदार राणे यांचे आभार मानले आहे.