You are currently viewing अधुरे प्रेम

अधुरे प्रेम

अष्टाक्षरी लेखन

तुझं माझं प्रेम कधी
नाही कळे कुणालाही.
क्षण साथ सोबतीचे,
विसरती स्वतःलाही.

गुज मनीचे तुझ्याच,
कान ऐकण्या आतुर.
मुके तुझे शब्द झाले,
मन जाणी ते चतुर.

किती होता अट्टाहास,
तुझा घेण्या प्रेम माझं.
जाणीलेच नाही कधी,
गुंतलेलं मन तुझं.

अधुरेच प्रेम गाणे,
ओठी रोज गुणगुणे.
नयनांत दुःख तुझ्या,
सारे दाटूनीच येणे.

नको दुसरे काहीही,
मनी होती एक आस.
असे जोवरी जीवन,
घ्यावा तुझ्यासाठी श्वास.

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा