कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपणा सगळ्यांचीच आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, मानसिक स्थिती बिघडवलेली आहे.आपल्या राज्यात काही जिल्ह्यात लहान मुलांच्या आईवडीलांचे कोरोनामुळे दुर्दैवी दुःखद निधन झाल्याने मुलं निराधार आणि पोरकी झालेली आहेत.अशा परिस्थितीत अशा निराधार मुलांना आधार देवून त्यांची काळजी घेणे, संरक्षण करणे आणि आवश्यक ती मदत करणे हे चाईल्ड लाईनचं कर्तव्य आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा आपत्तीमुळे जर काही मुलं निराधार झाली असतील आणि त्याबाबतची माहिती आपल्याकडे असेल तर आपण खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा व चाईल्डचाईल्ड लाईन्स लाईनच्या या समाजाभिमुख उपक्रमास सहकार्य करावे ही नम्र विनंती.
संपर्कासाठी …
एँड.नकुल पार्सेकर
संचालक, अटल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन,सावंतवाडी
मोबाईल ७७९८७१३४७५
कु.पुनम पार्सेकर, समन्वयक, चाईल्ड लाईन
मोबाईल ९०२२९४९११६
एँड.चिन्मय वंजारी, मोबाईल ७७६८०६३३८३
श्रीमती प्रज्ञा तांबे,मोबाईल ७२१८८३५८९०
एक हात मदतीचा,माणूस म्हणून आपल्या संवेदनशीलतेचा…