चंदनाचे दोन बाहू,परिसा समान काया
यम देवही घाबरतो अशी तिची किमया
धवल पोशाख घालता भासतेय साध्वी
रुग्णांना आधार देवून आत्मबळ वाढवी
भूमीवर आली जपण्या मानवी आरोग्या
यम देवही घाबरतो अशी तिची किमया
अहोरात्र मेहनत करते सेवावृत्ती अंगात
कडू गोळ्या खाऊ घालते मधूर हास्यात
सदोदित तत्पर सेवा ना विसरते कर्तव्या
यम देवही घाबरतो अशी तिची किमया
रुग्णांची भगिनी होते नाही तिज विसावा
पैशात मोजणार कसे,अनमोल आहे सेवा
देवता वाटते रूग्णा,इतकी लावते माया
यम देवही घाबरतो अशी तिची किमया
विलास कुलकर्णी
मीरा रोड
१२.५.२०२१