बांदा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी ‘माझा सिंधुदुर्ग ,माझी जबाबदारी ‘ही जबाबदारी ही मोहीम राबवली असून बांदा गावात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात आली.या मोहिमेत प्रत्येक घरोघरी भेट देऊन सर्व लोकांची माहिती गोळा जमा केली गेली असून यामध्ये लोकांच्या वयोगटानुसार असणार्या विविध आजाराची माहिती संकलित करुन थर्मल गनद्वारे तापमानाची नोंद केली असून सर्दी, ताप अथवा खोकला यापैकी कोणते लक्षणे आहेत का याची विचारपूस करुन नोंदी घेतल्या आहेत. या सर्वेक्षणासाठी प्राथमिक शिक्षक जे. डी. पाटील, रंगनाथ परब, वंदना शितोळे, देवेंद्र अहिरे, शीला भाईप, मंगल हडबे व आशा सेविका राजश्री आळवे,सुधा बांदेकर, सावली कामत, रितिका माजगावकर, संचिता धूरी व संजना सावंत यांच्या माध्यमातून सहा पथके बनवून संपूर्ण बांदा गावातील कुटुंबांची माहिती जमा करण्यात आली. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी बांदा सरपंच अक्रम खान, वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील व आरोग्य कर्मचारी तसेच कोरोना सनियंत्रण कृती समिती यांचे सहकार्य लाभले.