कणकवली प्रातिनिधी
जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन प्लांटची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यासाठी 72 लाख 44 हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे ते म्हणाले.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता घेणार 10 ॲम्बुलन्स व 6 शववाहिका आवश्यक आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात येणार आहे. आयुषचाही आढावा घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगेश पाडगावकर यांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल. अंदाजित 1 कोटी 47 लाख खर्च अपेक्षित आहे. जिल्हा मुख्यालयात लवकरच अद्ययावत जिम होणार आहे. ओरोस प्राधिकरण मध्ये मॉल प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणावर आरोप-प्रत्यारोप नको. जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पद आहे. ही बँक शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी आहे. सामंत यांनी सतीश सावंत यांचं केले कौतुक केले. दशावतार कलाकारांवर अन्याय होऊ देणार नाही. योग्य वेळी निर्णय घेऊ, कोविड च्या रुग्णांसाठी पैसे दिले जातात हे चुकीचे आहे. असे पैसे मिळतात म्हणून रुग्ण संख्या वाढवली जाते हे म्हणणेही चुकीचे असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.