You are currently viewing गोव्यात मृत्यूतांडव..

गोव्यात मृत्यूतांडव..

चार तासात 26 कोरोनाबाधितांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

हाय कोर्टामार्फत चौकशी करण्याची आरोग्य मंत्र्यांची मागणी

गोव्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मध्यरात्री मृत्यूतांडव पहायला मिळालं. मध्यरात्री दोन ते सकाळी सहाच्या दरम्यान, २६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी उच्च न्यायालयामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी उच्च न्यायालयामार्फत चौकशीची मागणी करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. प्रमोद सावंत यांनी जीएमसीएचचा दौरा केला. यावेळी त्यांनी मेडिकल ऑक्सिजनचा उपलब्धता आणि जीएमसीएचमधील कोविड-१९ वॉर्डपर्यंत याच्या पुरवठ्यामधील अंतरामुळे रुग्णांना काही अडचणी आल्या.

मात्र, हे बोलत असताना त्यांनी राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही, यावरही जोर दिला. तर दुसरीकडे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मात्र सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना जीएमसीएचमध्ये ऑक्सिजनचा अभाव असल्याचं मान्य केलं होतं.

मंगळवारी जीएमसीएचमध्ये ४८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर राज्यभरात ७५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गोव्याचे सरकारने मृतांची माहिती जाहीर करताना मृतांमध्ये कोविड१९,कोविड१९ न्यूमोनिया, बायलॅटरल कोविड न्यूमोनिया आणि गंभीर द्विपक्षीय गंभीर कोविड न्यूमोनियाचे रुग्ण होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या जीएमसीएचमधील दौऱ्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयामार्फत चौकशी करण्याची मागणी केली. “रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयामार्फत चौकशी व्हायला हवी. उच्च न्यायालयायने या प्रकरणात हस्तक्षेप करुन जीएमसीएचमधील ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत श्वेतपत्रिका तयार करण्यास सांगावी, जेणेकरुन काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्यास मदत मिळेल,” असं आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटलं. शासकीय रुग्णालयात मेडिकल ऑक्सिजनच्या १२०० मोठ्या सिलेंडरची आवश्यकता होती. पण केवळ ४०० सिलेंडरचाच पुरवठा झाला. जर मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा असेल तर तो दूर करण्यासाठी चर्चा करायला हवी, असं विश्वजीत राणे यांनी सोमवारी म्हटलं होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा