You are currently viewing एडगांव पुलावर कारला अपघात…

एडगांव पुलावर कारला अपघात…

वैभववाडी
चालकाचा ताबा सुटल्याने एडगांव पुलावर कार पलटी झाली. केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच कारमधील दोघेजण बालबाल बचावले आहेत. स्थानिक नागरिकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या मदतीने स्थानिक नागरिकांनी जखमींना गाडीतून बाहेर काढत पलटी झालेली गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. या अपघाताची माहिती वैभववाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली नव्हती.

कोल्हापूरहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटला. आणि कारची पुलाच्या कठड्याला धडक बसली. त्यात कार रस्त्यावर पलटी झाली. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. कार नदीत कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु नशीब बलवत्तर म्हणूनच ते दोघे बालबाल बचावले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा