You are currently viewing घुसमट

घुसमट

तुझीच सखे मज,
लागली ही आस.
पाहताची प्रिये तुला,
झाला मोकळा श्वास.

स्वप्न तुझीच रोज,
जागवती रात्रीत खास.
मिटले डोळे जरी,
होतात तुझेच भास.

दरवळ तुझ्या प्रेमाचा,
मनमंदिरी सुवास.
हृदयात तेव्हा माझ्या,
असतो तुझाच वास.

फुलपाखरा सारखीच,
असते तुझी मिजास.
भासते मनास जणू,
तू असतेस आसपास.

रस शोषूनी तू उडता,
झाला हृदयास त्रास.
हृदयातील प्रेमाचा तेव्हा,
होतो कायमचाच ऱ्हास.

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा