You are currently viewing एका दिवसात दोघांचा मृत्यू;  महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचा धोका वाढला..

एका दिवसात दोघांचा मृत्यू; महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचा धोका वाढला..

राज्यात कोरोनाचे संकट असतानाच कल्याण डोंबिवलीत म्युकरमायकोसीसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीत राहणारे बाजीराव काटकर आणि कल्याण ग्रामीण येथील महारण परिसरात राहणारे तुकाराम भोईर यांचा समावेश आहे. या दोघांचा उपचार डोंबिवलीतील एम्स या खाजगी रुग्णालयात सुरु होते. या रुग्णालयात या व्यतिरिक्त सहा रुग्णांवर म्युकरमायकोसीसचे उपचार सुरु आहे, अशी माहिती केडीएमसी आरोग्य विभागाच्या अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली आहे.

दोन रुग्णांचे मृत्यू म्युकरमायकोसीसमुळे ही घटना  राज्यासाठी धोक्याची घंटा  मानली जात आहे. आतापर्यंत केवळ ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांना म्युकोरमायकोसिसची लागण होताना दिसत होती. मात्र, आता हा रोग शहरी भागांमध्येही हातपाय पसरायला लागला आहे. नुकतीच ठाण्यातही एका महिलेला या रोगाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

हा आजार इतका गंभीर आहे की, रुग्णाच्या जगण्याची शक्यता केवळ 50 टक्के इतकी असते. तसेच यामुळे अंधत्त्व आणि इतर गंभीर व्याधी उद्धवू शकतात. रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता म्युकोरमायकोसिस साथीच्या आजाराप्रमाणेही फैलावू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आतापासूनच म्युकोरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही औषधेही प्रचंड महाग आहेत. त्यामुळे म्युकोरमायकोसिसचा वाढता संसर्ग राज्यासाठी नव्या संकटाची चाहुल मानली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा