जागा बदलून बैठका सुरूच…
फोंड्यातील दात पडक्या आप्पा आणि पारावरचा विठ्ठलाची जुगाराची मैफिल आज दुपारी १२.३० वाजता साईनगर फोंडा येथील पाण्याच्या टाकी नजीक सुरू होती. दात पडक्या आप्पा आणि पारावरचा विठ्ठल यांचा मॅनेजर आणि जुगाराच्या बैठकीचा मुख्य सूत्रधार रांगो उर्फ पारावरचा रोहित हे संवाद मीडिया प्रत्येक बैठकीची संपूर्ण माहिती देतो म्हणून जागा बदलून बैठका घेत असतात.
आज साई नगर फोंडा येथे बसलेल्या बैठकीमध्ये दात पडक्या आप्पा आणि पारावरच्या विठ्ठलाचे पटाचे दीड लाख रुपये गेले. त्यामुळे दुपारी ३.०० वाजताच जुगाराचे खेळी घरी गेले. दीड लाख रुपये गेल्यामुळे पारावरच्या विठ्ठल आणि दात पडक्या आप्पाने रांगो वर आगपाखड केली. गेले दोन दिवस जुगाराच्या बैठकांमधून पैसे येण्यापेक्षा पैसे जाण्याचेच प्रकार जास्त होत आहेत.
जुगाराच्या बैठकांमध्ये भले जुगाऱ्यांचे तक्षीमचे पैसे गेले तरी खाकीच्या शिलेदारांना मात्र त्यांचे प्रत्येक बैठकींसाठी असलेले मानधन पोच होत आहे.