आमदार दिपक केसरकर यांची माहिती; भविष्यात जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज जिल्ह्यातच होईल पूर्ण
सावंतवाडी
भविष्यात ऑक्सिजनची गरज ओळखून सावंतवाडी येथे ऑक्सिजन प्लांट उभा करण्याबाबत खाजगी उद्योजकांशी बोलणे सुरू असून, हा प्लांट उभा झाला तर जिल्हयाची ऑक्सिजनची गरज पूर्ण होईल असे मत राज्याचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी झूम ऍप द्वारे आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत मांडले आहे. यावेळी ते म्हणाले की, सावंतवाडीत वाढते कोरोना रूग्ण लक्षात घेउन बेंडची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. सोमवारी येथील तहसिलदार कार्यालयात लॉकडाउन तसेच ईद सणाच्या पार्श्वभूमी वर आयोजित करण्यात आलेल्या बैठकी नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयातील चार व्हेटिलेंटर बेंड लवकरच सुरू होतील. ऑक्सिजन पाईन लाईनचे लिकेज काढण्या चे काम सुरू झाले आहे. ते एक ते दोन दिवसात संपेल त्यानंतर अधिकचे बेंड उपल्बध होतील तसेच सिंधुदुर्गला ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज ओळखून काहि खाजगी उद्योजक पुढे आले आहेत. ते सावंतवाडी येथे ऑक्सिजन प्लांट उभा करणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या जागेबाबत बोलणी सुरू आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सावंतवाडी तालुक्यातील काही खाजगी उद्योजकांशी ही बोलणे सुरू असून ते आरोग्य विभागाला मदत करतील अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. कोरोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेउन सावंतवाडीत आणखी बेड वाढवण्यात येणार असून, त्यासाठी लागणारा आरोग्य कर्मचारी वर्ग ही भरण्यात येणार आहे. याला तत्काळ मंजूरी मिळावी यासाठी मंगळवारीच जिल्हाधिकारी यांची भेट घेउन तशी मागणी करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे. भविष्यात तिसरी लाट ही गंभीर स्वरूपाची असल्याचे लहान मुलांसाठी धोकादायक आहे. हे लक्षात घेउन राज्याच्या टास्क फोर्स सोबत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बोलणे करून देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य मंत्रीही लवकरच सिंधुदुर्ग मधील डॉक्टरांशी संवाद साधतील अशी माहिती आमदार दिपक केसरकर यांनी यावेळी दिली आहे.