You are currently viewing खनिकर्म निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटणला ऍम्ब्युलन्स उपलब्ध …

खनिकर्म निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटणला ऍम्ब्युलन्स उपलब्ध …

सूर्यकांत भालेकर यांनी मानले आभार

आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या अध्यक्षा मा.सौ. संजना सावंत यांच्यामाध्यमातून खनिकर्म निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटणला ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्ण कल्याण समिती प्राथ. आरोग्य केंद्र खारेपाटणचे सदस्य तथा भाजपा खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी आम.नितेश राणे आणि मा.सौ.संजना सावंत यांचे आभार मानले.

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे आरोग्य केंद्र असून या ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका नसल्याने बऱ्याचदा गैरसोय होत असे. त्यामुळे या आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक रुग्णवाहिका मिळावी अशी मागणी रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा माजी वित्त व बांधकाम समितीचे सभापती, जि.प.सदस्य बाळा जठार यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषदेने तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल खारेपाटण परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे असे श्री.भालेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा