You are currently viewing खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेला ४८ लाखांचा निधी मंजूर…

खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेला ४८ लाखांचा निधी मंजूर…

वेंगुर्ला
खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत सुमारे ४८ लाख ४४ हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. या बाबतची माहिती वेंगुर्ले शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ यांनी दिली.
वेंगुर्ले शहरातील विविध विकास कामांसाठी खासदार विनायक राऊत यांनी पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांचे वेंगुर्ले शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा