– कुणाल किनळेकर
पर्यटक म्हणून जिल्ह्यात येणाऱ्या पालकमंत्र्यानी आपण जनतेसाठी खुप काहीतरी करतो असे भासविण्यासाठी अचानक पाच दिवसांचा कडक तुघलकी लॉकडाउन करून जनतेच्या त्रासात अजुन भर पाडली
गेल्या वर्षभरापासून सगळच ठप्प सर्वच स्तरांतील लोकांची आर्थिक गणित बिघडलेली. जगायच कसं हा मोठा प्रश्न असताना केंदाचे नियम वेगळे, राज्याचे नियम वेगळे त्यात आमच्या पालकमंत्र्यांनचे नियम. राज्य सरकार म्हणतंय मालवाहतूक, गौण खनिज वाहतूक, घरबांधणी व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक चालु असेल.काल अचानक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सर्वच बंदचे आदेश का दिले.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या कामाची लगबघ, अपुर्ण असलेली तसेच नवीन घर बांधणी तसेच घर दुरुस्तीची कामे त्याचप्रमाणे सार्वजनिक व वैयक्तिक विहीरींची कामे सामान्यानी करायची कशी.
आणि जर का सर्वसामान्याच्या गरजेचे बंद ठेऊन कोरोना प्रसार थांबणार तर मग जे कळणे व रेडी येथील धनाढ्य मायनिंग व्यवसाईकांनचे उत्कखन आणि वहातूक जोरात सुरु आहे त्यामुळे कोरोनाचा प्रसार होणारच नाही का. असा सवाल कुणाल किनळेकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग यांनी विचारला आहे.