You are currently viewing ब्लॅक अँड व्हाईट

ब्लॅक अँड व्हाईट

आजही आठवते मला माझी,
माजघरातील कृष्णधवल टीव्ही,
अलगद सरकवायच्या दारांची,
इसी टीव्ही वाटे आजही हवी.

आजसारखे रंगीत नसले तरी,
छायागीत चित्रहार आवडते असायचे.
आठवड्यातून एकदा लागले तरी,
आवड आठवडाभर मनात जपायचे.

रविवारचं रामायण म्हणजे,
वाटे किर्ती त्याची अपार.
मुद्रा राम-सीतेची पाहून,
तन मन प्रसन्न करी फार.

कार्यक्रम नसायचे दिवसभर,
काही वेळच आनंद मिळायचा.
ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात,
आनंदाला पारावार नसायचा.

कित्येकवेळा खवलं यायची,
टीव्हीवरील चित्र गायब व्हायची.
वाऱ्याने जरी फिरला अँटेना,
हाताने फिरवून त्याची दिशा बदलायची.

आजकाल बरंच काही लागतं,
त्याकाळाचं सुख कुठे यात असतं.
मनोरंजनाच्या नावावर काहीही खपतं.
पण खरंच निर्भेळ मनोरंजन त्यात भेटतं?

(दिपी)
दीपक पटेकर. सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 4 =