खासदार राऊत यांचा पाठपुरावा, कांदळगावकर, जोगी, नगरसेवकांनी मानले आभार…
मालवण
खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यातून नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतंर्गत येथील पालिकेच्या सुमारे बारा कामांसाठी ४४ लाख ४२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
मालवण पालिकेने सुचविलेल्या या बारा कामांमध्ये पालिका हद्दीतील चिवला बीच धुरीवाडा मच्छीमार निवारा शेडनजीक हायमास्ट, माजी गणेश चौक टोपीवाला हायस्कूल नजीक हायमास्ट, आडारी गणपती मंदिर येथे विद्युतीकरण करणे या कामांसाठी १३ लाख १८ हजार रुपये, पालिका हद्दीतील बागायत घर ते गारूडेश्वर येथील रस्त्यावर विद्युतीकरण, रेवतळे आदर्शनगर येथील रस्त्यावर विद्युतीकरण करणे या कामांसाठी १२ लाख ८९ हजार रुपये, भरड येथील बाळू कोळंबकर घर ते गवंडीवाडा येथील रस्त्यावर विद्युतीकरण, आडारी गणपती मंदिर परिसर विकसित करणे, बैठक व्यवस्था करणे, मेढा चर्च येथे मिनी हायमास्ट बसविणे, वायरी केळबाई मंदिर येथे मिनी हायमास्ट, वायरी गावकरवाडा देवालय येथे मिनी हायमास्ट बसविणे, भरड चर्मकार वसाहत येथे मिनी हायमास्ट बसविणे, भरड दत्तमंदिर येथे मिनी हायमास्ट बसविणे या कामांसाठी १८ लाख ३५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.