फक्त 45 वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठीच लस झाली उपलब्ध
दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असणाऱ्यांना मिळाला दिलासा
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविशील्डचे 18,000 डोस आणि कोव्हॅक्सींनचे 600 डोस प्राप्त झाले आहेत. हे सर्व डोस 45 वर्षावरील नागरिकांना दुसऱ्या डोस साठीच वापरण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी दिली.
10 व 11 मे रोजी डोस दिले जाणार असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी गर्दी न करता डोस घेऊन सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. दरम्यान दुसरा डोस घेण्यासाठी अनेक लोक प्रतीक्षेत होते त्यांना आता दिलासा मिळाला आहे.