जुगाराच्या माध्यमातून कणकवली तालुक्यात वाढतात रुग्ण.
कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात वाढत असतानाच फोंडा येथील दात पडक्या आप्पा आणि पारावरच्या विठ्ठलाचा मॅनेजर व जुगाराचा मुख्य सुत्रदार रांगो उर्फ पारावरचा रोहित याने जुगारासाठी आलेल्या सर्व जुगाऱ्यांना काल दुपारी डाळ भात आणि बटाट्याची भाजी असे शाकाहारी जेवण देत दुपारी आपली जुगाराची मैफिल भैरेवाडीत झाडाखाली सजवली.
या जुगाराच्या पहिल्या बैठकीत पटाला मिळाले तब्बल ४००००/- रुपये, परंतु दुसऱ्या पटाला मात्र जुगाराच्या बैठकीत गेले १ लाख ३८००० रुपये. रांगो भर माळरानावर जुगाराच्या मैफिली अगदी बिनधास्तपणे बसवत असून कणकवली येथे जोपर्यंत एपीआय कापू तराट आहे तोपर्यंत आपलं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. एपीआय कापू तराट याला दिवसाला ५०००/- रुपये हफ्ता मिळतो तर आऊट पोष्टवर असणाऱ्या बंजारी पोलीसला ४०००/- रुपये दर दिवसाला हफ्ता ठरलेला आहे. दिवसाला एखाद्या ग्रेड १ ऑफिसर ला मिळणाऱ्या वेतनापेक्षा जास्त पैसे जुगाराच्या बैठका झडू देणाऱ्या पोलिसांना मिळत आहेत, त्यामुळे जुगाराचे फड जागा बदलून रोजच्यारोज बसत आहेत.
जुगाराच्या बसणाऱ्या बैठकांमध्ये कोणतेही सोशल डिस्टन्स अथवा मास्क लावले जात नसल्यानेच कणकवली तालुक्यात दरदिवशी कोरोनाचे रुग्ण प्रमाणापेक्षा जास्त वाढत आहेत. कणकवली च्या आजूबाजूच्या गावातील जुगारी रोज या बैठकांमध्ये जुगार खेळायला जातात. त्यामुळे तालुक्यात गावागावात, घराघरात रुग्ण वाढत आहेत. पोलीस खात्यातील जनतेचे रक्षक म्हणवणारे एपीआय सारखे अधिकारी आणि हवालदार जुगारयांकडून हफ्ते घेऊन कोरोनाचा प्रसार होण्यासाठी हातभार लावत असतील तर जिल्हा पोलिस प्रमुख आपल्या अधिकारी आणि पोलिसांवर कारवाई करणार आहेत की नाहीत?