सिंधुदुर्गातील लससाठा संपला; कित्येक नागरिक अद्याप पहिल्या डोसच्या प्रतीक्षेत
ऑनलाईन नोंदणी रजिस्ट्रेशनही थांबवले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी उपलब्ध झालेली लस अवघ्या दिवसभरातच लस संपली. सध्या लसीकरणासाठी सर्व वयोगटातील व्यक्तीना ऑनलाईन नोंदणी करणे सक्तीचे आहे. परंतु सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात लस साठाच नसल्याने ऑनलाईन नोंदणी रजिस्ट्रेशन थांबविण्यात आले आहे. त्यामुळे अनेकजण ऑनलाईन बुकिंगसाठी दिवस-रात्र ॲपवर लक्ष ठेवून आहेत. कोल्हापूर आणि गोवा या भागात लसचा साठा मुबलक आहे. तसे ऑनलाईन नोंदणीमध्ये दाखवलेही जात आहे. मात्र सध्या जनता कर्फ्यू असल्याने गोवा- कोल्हापूर सीमा बंद असल्यामुळे सिंधुदुर्गातील तरुण-तरुणींना लस घेणे आता अशक्यप्राय झाले आहे. सिंधुदुर्गासाठी कोटा वाढवून देण्यात यावा अशी मागणी आता होत आहे.