You are currently viewing शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले वितरण

राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध झाले आहेत. यातील २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला देण्यात आले आहेत. आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, समुदाय आरोग्य अधिकारी श्रीम. वाघमारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्येत वाढ सुरु आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असून यासाठी जिल्ह्यात सुरुवातीला एक ऑक्सिजन प्लांट व काल दुसरा ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात आला आहे. त्याचबरोबर ना. आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध झाले आहेत. त्यातील २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर शिरवल विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला देण्यात आले आहेत.
याप्रसंगी कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, समुदाय आरोग्य अधिकारी श्रीम. वाघमारे, शिरवल सरपंच महेश शिरवलकर,आरोग्य सेवक सुनील जाधव. आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा