आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुसज्ज अशी रुग्णवाहीका मिळणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी खनिकर्म निधीतून हि रुग्णवाहीका देण्याचे आश्वासन दिलेे आहे,अशी माहीती जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणी गावडे यांनी दिली. याबाबत त्यांनी माहीती दिली. आंबोली हे जगाच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून आहे. मात्र त्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुसज्ज अशी रुग्णवाहीका नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. दरम्यान या ठिकाणी रुग्णवाहीका देण्यात यावी, यासाठी आपण आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रयत्न केला होता. त्यानुसार त्यांनी खनिकर्म निधीतून सुसज्ज अशी रुग्णवाहीका देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार येत्या चार दिवसात हि रुग्णवाहीका आंबोलीत दाखल होणार आहे,असे गावडे यांनी सांगितले.
आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली सुसज्ज रुग्णवाहीका…
- Post published:मे 8, 2021
- Post category:आरोग्य / बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments