You are currently viewing समाजवादी विचारसरणीच्या शतायुषी आजी प्रेमाबाई वाळके अनंतात विलीन

समाजवादी विचारसरणीच्या शतायुषी आजी प्रेमाबाई वाळके अनंतात विलीन

सावंतवाडी

कॉटेज हाॅस्पिटल परिसरातील रहिवासी प्रेमाबाई राजाराम वाळके (१०४) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. उपचारादरम्यान सकाळी ८ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कै. नाथ पै, प्रा. मधु दंडवते. कै. जयानंद मठकर यांचे त्यांच्याशी घरोब्याचे संबंध होते.

प्रा. मधु दंडवते ५ वेळा खासदार, दोन वेळा केंद्रीय मंत्री झाले तरी वाळके यांच्याकडे रहातं होते. सर्व समाजवादी नेते कार्यकर्ते यांचं हक्काचे घर म्हणून ओळखलं जाणाऱ्या राजाराम उर्फ आबा वाळके यांच्या त्या पत्नी होत.

सावंतवाडीच्या १३ आमदारांना मतदान करण्याच भाग्य त्यांना लाभले होते. समाजवादी विचारांच्या या आजींनी आजतागायत कधीच आपल्या मतदानाचा हक्क बजावण सोडलं नव्हतं. त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात ३ मुलगे सुहास, सुधीर, सुरज व सुना ३ मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा