मालवण
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मालवण तालुक्यातील गाव वराड येथे ग्रामपंचायत वराड व ग्राम सह नियंत्रण समिती वराड यांच्या वतीने वराड ग्रा. पं.हद्दीमध्ये दि.8 मे ते 15 मे या कालावधीत जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आलेला आहे.असे गावचे सरपंच व समितीचे अध्यक्ष श्री.बबन मिठबावकर यांनी सांगितले.
वराड गाव हा लोकसंख्येने मोठा असून गावात 20 ते 22 वाड्या आहेत.त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात लोकांची ये जा असते.या पार्श्वभूमीवर कारोना संसर्ग वाढण्याचा धोका संभवतो.याचा गांभीर्याने विचार करून हा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला असून या कालावधीत गावातील लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच श्री. मिठबावकर यांनी केले आहे.
या जनता कर्फ्यु मध्ये गावातील सर्व दुकाने बंद असतील,गावातील कुणीही गावाबाहेर किंवा बाहेरून गावात येण्यास मज्जाव करण्यात येणार आहे.तसेच गावात एखादे काम चालू असेल तर त्या कामगारांनी गावातच राहायचे आहे.यात मेडिकल साठी लोकांना आवश्यक बाबींची पूर्तता करून जाण्यास मुभा असेल.विनाकारण फिरण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.