आमदार नितेश राणे यांच्या स्वखर्चातून बनविले प्रवेशद्वार
देवगड
देवगड तालुक्यातील काळंबाई येथील आमदार नितेश राणे यांच्या स्वखर्चातून करण्यात आलेल्या काळकाई देवीच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. देवगड सभापती रवी पाळेकर व माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती व स्थानिक देवस्थान कमिटी मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच मनोहर मूळम, सुरेश मूळम,ग्रा.प सदस्य अशोक मूळम,जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर पुजारे, भाजपा बूथ प्रमुख संदीप मूळम, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.