You are currently viewing चराठा बांदेकर स्वीट्सचे भाऊ बांदेकर यांचे निधन

चराठा बांदेकर स्वीट्सचे भाऊ बांदेकर यांचे निधन

सावंतवाडी
ओटवणे गावठणवाडी येथील रहिवासी आणि चराठा येथील प्रसिद्ध बांदेकर स्वीट्स प्रोडक्टचे मालक बाळकृष्ण उर्फ भाऊ गोपाळ बांदेकर (४१) या तरुणाचे गुरूवारी सायंकाळी उशिरा निधन झाले. त्यांच्या अकाली व आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच ओटवणे आणि चराठा गावावर शोककळा पसरली. गेले पाच दिवस त्यांच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गेली आठ वर्षे त्यांनी आपल्या व्यवसायात जम बसवून विस्तार केला होता. आठ दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस झाला होता. त्याच्या आकस्मिक निधनाचा सर्वांच्या मनाला चटका लागला. रात्री उशिरा सावंतवाडी उपरलकर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील दिगंबर बांदेकर यांचा तो भाऊ तर सावंतवाडी येथील माजी नगरसेवक राजा स्वार यांचा तो भाचा होय. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, एक भाऊ, बहीण, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा