You are currently viewing बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन….

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन….

सिंधुदुर्गनगरी

केंद्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या राजीव गांधी  मानव सेवा पुरस्कार व विशेष नैपुण्य पुरस्कार या पुरस्कारांऐवजी आता ”बाल शक्ती” व ”बाल कल्याण” हे पुरस्कार देण्याचे केंद्र शासनाने जाहिर केले आहे. त्यासाठी याही वर्षी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

बाल शक्ती पुरस्कारासाठी शिक्षण, कला, सास्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 5 ते 18 वर्ष वयोगट असलेल्या मुलांना हा प्रस्ताव सादर करता येईल.

            बाल कल्याण पुरस्कारासाठी वैयक्तिक पुरस्कारामध्ये मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा वेतन न घेता मानवसेवी या भावनेतून कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुस्कार देण्यात येतो. तर संस्था स्तरावर बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. तसेच बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्याने कार्य करणारी असावी.

            या पुरस्कारासाठीचे निकष केंद्र शासनाच्या  www.wcd.niv.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याबाबतची अधिक माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयातील दूरध्वनी क्र. 02362-228869 येथे संपर्क साधावा. तसेच सदर पुरस्काराचे प्रस्ताव वरील दिलेल्या संकेत स्थळावरुन ऑनलाईन दि. 15 सप्टेबर 2020 पर्यंत स्विकारले जाणार आहेत.  विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. तरी ईच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा