सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हयामधील लसीकरण केंद्राकरिता आजअखेर कोविशिल्ड लसीचे 98580 डोस व कोव्हॅक्सीन लसीचे 35810 डोस अशाप्रकारे एकूण 134390 डोस प्राप्त आहेत. आजअखेर जिल्हायामध्ये एकूण 119106 नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलेले आहे. त्यापैकी 97497 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला असून 21609 नागरिकांना दोन्ही डोस घेतलेले आहेत. आजमितीस सुमारे 50000 नागरिकांना दुसरा डोस देणे अपेक्षित आहे. या नागरिकांकरिता आवश्यक लसीची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे व केंद्र शासनाकडे केलेली आहे. लस प्राप्त होताच दुसऱ्या डोससाठी पात्र उर्वरीत सर्व नागरिकांचे लसीकरण संबंधितांना अवगत करुन, करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन डॉ. महेश खलिपे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले आहे.