You are currently viewing प्रसिद्ध हास्यकवी संतोषजी कोकाटे यांचे दीर्घ आजाराने निधन

प्रसिद्ध हास्यकवी संतोषजी कोकाटे यांचे दीर्घ आजाराने निधन

नाशिक

अकोला येथील प्रसिद्ध हास्यकवी संतोषजी कोकाटे यांचे किडनींच्या दुर्धर आजारपणामुळे हास्यदिनी दि. २ मे रोजी निधन झाले.

महाराष्ट्र भर परिचित असलेल्या कवी विचार मंच शेगाव बहुउद्देशीय संस्था, अकोला समूहाचे संतोष कोकाटे केंद्रीय सचिव होते. तर अंकुर साहित्य मंडळाचे विदर्भ प्रमुख होते. हास्यकवी म्हणून ते महाराष्ट्र भर प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती रजनीताई, दोन विवाहित मुलगे स्वप्नील, सूरज व विवाहित मुलगी तसेच सूना, नातवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्र, मासिकांमधून त्यांचे हास्य कविता नेहमी प्रसिद्ध होत असत. कवी विचार मंच चाहते, वाचक कवी, कवयित्री असा फार मोठा साहित्यिक परिवार त्यांच्या निधनानंतर शोक सागरात बुडाला आहे.

कवी विचार मंच,शेगाव च्या सहाही शाखांमध्ये स्वर्गीय संतोषजी कोकाटे यांचा साहित्यिक आप्तपरिवार आहे. हास्यकवी म्हणून विदर्भातील विविध साहित्य संमेलने, कार्यक्रम उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेत असत, तसेच प्रत्येक आयोजन नियोजनात त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. किडनी सारख्या दुर्धर आजाराने त्यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी नुकतेच निधन झाले. एका हास्यकवींचे असे अचानक निघून जाणे साहित्य क्षेत्राचे खूप मोठे नुकसान असून त्यांच्या निधनाने कवी विचार मंच शेगाव या साहित्यिक समूहाची खूप मोठी हानी झाली आहे.

विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रामध्ये सर्वदूर एक कौटुंबिक साहित्यिक संघटन म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्व. संतोषजी कोकाटे यांच्या दुःखद निधनाने कवी विचार मंच शेगाव च्या सहाही शाखांमधील सर्व कवी, कवयित्री, कथाकार गझलकार, गायक, गायिका यांनी व केंद्रीय कार्यकारिणी शिवशंकर चिकटे, राधिका देशपांडे, अलका बोर्डे, विद्या बनाफर, किशोर कुमार मिश्रा, नरेंद्र जकाते, महाराष्ट्रातील शाखा नाशिक जिल्हा पदाधिकारी रविकांत शार्दूल, मीलन खोहर, अंजना भंडारी, नंदकिशोर ठोंबरे, शिलाताई गहिलोत, यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाबद्दल साहित्य वर्तुळात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रविकांत शार्दूल नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा