You are currently viewing मालवणात जनता कर्फ्यु नाही तर उद्यापासून कडक निर्बंध…

मालवणात जनता कर्फ्यु नाही तर उद्यापासून कडक निर्बंध…

१०.४५ वाजता भोंगा वाजवून व्यापाऱ्यांना करणार सतर्क; त्यानंतर प्रशासनाची धडक कारवाई मोहीम…

मालवण

शहरात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी जनता कर्फ्यु करण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उद्यापासून शहरात कडक निर्बंध राबविण्याचे आज झालेल्या तातडीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. सकाळी सात ते अकरा यावेळेत अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी राहतील. यात दुकाने बंद करण्यासाठी १०.४५ वाजता पालिकेचा भोंगा वाजविला जाईल. त्यानुसार व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद करायची आहेत. त्यानंतर संपूर्ण शहरात तहसील, पोलिस, पालिका यांची संयुक्त धडक कारवाई मोहिम राबविण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आज पालिका सभागृहात तातडीची बैठक बोलाविली. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर, उपनगराध्यक्ष राजू वराडकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार केणी, यतीन खोत, दर्शना कासवकर, ममता वराडकर, पूजा सरकारे, पूजा करलकर, आप्पा लुडबे, शीला गिरकर, नितीन तायशेटे, उमेश नेरूरकर, नाना पारकर, रवी तळाशिलकर, राजा शंकरदास, मेघा सावंत, मसऊद मेमन, विजय केनवडेकर, बाबी जोगी, दिलीप घारे, विकी चोपडेकर, गणेश प्रभुलीकर, नंदू गवंडी, मनीषा जाधव, शेखर गाड, मोहन वराडकर यांच्यासह शहरातील अन्य व्यापारी बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा