You are currently viewing अखेर कणकवली नगरपंचायतच्या स्वतंत्र कोविड केअर सेंटरला परवानगी

अखेर कणकवली नगरपंचायतच्या स्वतंत्र कोविड केअर सेंटरला परवानगी

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

कणकवली:

​कणकवली नगरपंचायतच्या​ ​मार्फत कणकवली पर्यटन सुविधा केंद्रात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला अखेर स्वतंत्र परवानगी देण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. यापूर्वी नगरपंचायतीच्या कोविड केअर सेंटरला हरकुळ बुद्रुक केअर सेंटरची संलग्न परवानगी देण्यात आली होती. मात्र ही परवानगी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नाकारत नगरपंचायत ला स्वतंत्र परवानगी देण्याची मागणी केली होती. अखेर त्या मागणीला यश आले आहे.

याबाबत सातत्याने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे देखील पाठपुरावा करण्यात आला होता. या कोविड केअर सेंटरला समन्वय अधिकारी म्हणून डॉ. रूपाली वळंजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या संदर्भात आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याबाबत समन्वय साधण्याच्या सूचना मुख्याधिकारी कणकवली यांना देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा