You are currently viewing लसीकरणाच्या लसींचे योग्य नियोजन करा – संजना सावंत

लसीकरणाच्या लसींचे योग्य नियोजन करा – संजना सावंत

कणकवली तालुक्यातील प्रा.आ. केंद्रांना जि.प. अध्यक्षांनी दिल्या भेटी; लसीकरणाचा घेतला आढावा…

कणकवली

कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सर्वत्र होत आहे. त्यामुळे लसीकरण फार महत्त्वाचे आहे, कोरोनापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याचे नियोजन करावे. जास्तीत जास्त कणकवली तालुक्यात लसीकरण झाले पाहिजे, त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करा अशा सूचना सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावन यांनी दिल्या.

कणकवली तालुक्यात होत असलेल्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. त्यामध्ये नांदगाव, फोंडा कासार्डे, कळसुली आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. यावेळी सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ, जिल्हा परिषद सदस्या श्रिया सावंत, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी महिला बाल कल्याण सभापती सायली सावंत, सुजाता हळदीवे, सदस्या हर्षदा वाळके, संतोष आग्रे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा