You are currently viewing माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला हॅन्डग्लोज, सॅनिटायझर वाटप….

माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला हॅन्डग्लोज, सॅनिटायझर वाटप….

कुडाळ

आंतरराष्ट्रीय मानवाअधिकार वेल्फेअर असोशियनच्या मार्फत माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रला हॅन्डग्लोज, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटाला लढा देण्यासाठी अहोरात्र सर्व शासकीय यंत्रणा मेहनत घेत असते. हॉस्पिटल मधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, वाॅडबाॅय, दिवस-रात्र रुग्णांची सेवा करत असतात. कोरोना योद्धांची काळजी घेणे गरजेजे आहे. त्यातच माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन संघटनेचे पदाधिकारी ॲड.मोहन पाटणेकर, बाळा कोरगांवकर माध्यमातुन सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश पाटील होते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मानवधिकार वेल्फेअर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस राकेश केसरकर, महिला जिल्हा अध्यक्षा दर्शना केसरकर,सुप्रिया पाटणेकर, अमित देसाई, पांडुरंग खरात, अक्षय उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा