You are currently viewing नांदगाव येथे कार–दुचाकीत अपघात…

नांदगाव येथे कार–दुचाकीत अपघात…

दुचाकीस्वार गंभीर जखमी

कणकवली

कणकवलीहुन देवगड च्या दिशेने जाणारी एक्टिवा आणि कोल्हापूर वरून गोव्याच्या दिशेने जाणारी कार या दोघांमध्ये नांदगाव सर्विस रोड येथे अपघात झाला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात घडला.
जखमी दुचाकी चालकाला अधिक उपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. कार भरधाव वेगात असल्याने दुचाकी कारच्या पुढील बाजूला अडकून फरफटत गेल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा