रंग तुझे वेगवेगळे,
आकार साधा सरळ,
देखणी जरी नसलीस,
तरी पाडून जातेस भुरळ.
हिरव्यागार फांदीवर,
झुपकेदार फुलतेस.
लांब तुझ्या देठावर,
नाजूक तू भासतेस.
फिकट अबोली रंग,
आकर्षून घेतो मनास.
रंग जर्द पिवळा भगवा,
आवडतो सर्व जनास.
दाटीवाटीने तुझे राहणे,
वाऱ्यासवे हळुवार डोलणे.
अबोली जरी असलीस तरी,
मनास भावते तुझे लाजणे.
सुवासिनींच्या केसात,
दोऱ्यात ओवून माळतात.
अबोलीचा वळेसार म्हणून,
अपूर्वाईने तुला नावाजतात.
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६