You are currently viewing थांबलेल्या डंपरला रुग्ण वाहिकेची पाठीमागून धडक…

थांबलेल्या डंपरला रुग्ण वाहिकेची पाठीमागून धडक…

दर्शनी भागाचे नुकसान

बांदा
बुधवारी दुपारच्या सुमारास दोडामार्ग वरून बांदा येथे येत असताना बांदा कट्टा येथील महामार्गावर रस्ता क्रॉस करण्यासाठी उभा असलेल्या डपंर ला मागून येऊन ओव्हरटेक करत असलेल्या रुग्णवाहिकेची धडक बसली, या धडकेत रुग्ण वाहिकेच्या दर्शनि भागाचे नुकसान झाले असून कोणालाही दुखापत झाली नाही.
अपघाताची बातमी मिळताच बांदा पोलीस अधिकारी समीर भोसले, पोलीस कर्मचारी विजय जाधव, सिद्धार्थ माळकर यांनी घटनास्थळी धाव घेत वाहनांना रास्ता करून दिला, अपघात आपआपसात मिटवण्यात आल्याने या अपघाताची नोंद बांदा पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा