You are currently viewing कंटेनमेंट झोन बाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घ्या-ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांचा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांना फोन

कंटेनमेंट झोन बाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घ्या-ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांचा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांना फोन

ग्रामपंचायती मधून लागेल ते सहकार्य करू पण आरोग्य सेवा देण्यास कमतरता नको; जनतेनेही आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना सहकार्य करावे ग्रा. प.सदस्य नवलराज काळे यांचे आवाहन

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यात सध्या कोरोनानी थैमान घातले आहे. त्याचप्रमाणे सडूरे येथेही कोरोनानी शिरकव केला आहे. काही लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे, या पार्श्वभूमीवर ती नवलराज काळे यांनी पॉझिटिव्ह रुग्ण भेटतील तिथेच सॅनीटायजर‌ फवारणी नको तर सरसकट संपूर्ण गावाची सॅनीटायजर‌ फवारणी करा अशी सूचना ग्रामपंचायतीला दिली. आरोग्य विभागाला ग्रामपंचायतीकडून लागेल ते सहकार्य करू योग्य पद्धतीने आरोग्यसेवा गावांमध्ये द्या अशा सूचना देखील आरोग्य विभागाला नवलराज काळे यांनी केल्या. ग्रामपंचायतीकडून आरोग्य विभागाला थर्मल गण , ऑक्सी मिटर देण्यात येईल. लवकरच गावातील प्रत्येक घर टू घर आरोग्य तपासणी सर्वे करा. सडूरे चव्हाणवाडी येथील परिस्थितीचा प्रत्यक्ष जाऊन आढावा घेत असताना नवलराज काळे यांनी वैभववाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांच्याशी फोन वरून संपर्क साधला, सडूरे शिराळे गावातील कंटेनमेंटन झोनबाबत निर्णय घेत असताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, सेवा समिती दलाच्या कमिटी व गावातील आरोग्य विभागाला विश्वासात घेऊनच कंटेनमेंट झोन जाहीर करावे अशा सूचना केल्या. असे केल्यामुळे स्थानिक पातळीवर कंटेनमेंट झोन मध्ये अत्यावश्यक सेवा देणेसाठी योग्य पद्धतीने नियोजन करता येईल.तसेच ज्या भागामध्ये कंटेनमेंट झोन आपण जाहीर करता त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असावा अशा सूचना देखील काळे यांनी डॉ.पवार यांच्याकडे केल्या. कंटेनमेंट झोन बाबत लेखी स्वरूपात माहिती संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला व गावातील आरोग्य यंत्रणेला द्यावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरेला रुग्णवाहिकेची सोय करून द्यावी.या रुग्णवाहिकेमुळे सडुरे शिराळे सहीत कुर्ली, अरुळे निम अरूळे, सांगुळवाडी, नावळे गावांना मोठा फायदा होणार आहे. त्यावर लवकर निर्णय घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असा आग्रह काळे यांनी धरला. या संकटाला सर्वांनी एकत्र मिळून सामोरे जाऊया गावातील जनतेने आरोग्य विभागातील सर्व अधिकारी,कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे. आपले गाव कोरोना मुक्त गाव बनवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य नवलराज विजयसिंह काळे यांनी यावेळी केले.
यावेळी गावचे सरपंच संतोष पाटील,ग्रामसेवक गणेश जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष दीपक चव्हाण, श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग चे सचिव तथा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड.विक्रमसिंह काळे, प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे मधील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियांका बंडगर,आरोग्य सेविका शीतल चाफे, आशा कर्मचारी वैशाली रावराणे,दीपिका भावे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा