सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीची मागणी
तळेरे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक शासनाने नेमून दिलेली कामे करीत फ्रंन्टलाईन कोरोना योध्दा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सर्व शिक्षकांनी आपली महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.मात्र गेल्यावर्षापासुन परजिल्ह्यातील शिक्षक आपल्या मुळ गावी गेलेले नाहीत.
सध्या १मे २०२१पासुन उन्हाळी सुट्टी शासनाने जाहीर केली असूनही शिक्षकांनी आपले मुख्यालय सोडू नये असा वरिष्ठांचा आदेश असल्याने संबंधित शिक्षकांना आपल्या मुळ गावी जाता येत नाहीत. २२मार्च २०२०पासून जिल्ह्यात अडकून राहिलेल्या जिल्ह्याबाहेरील शिक्षकांची मोठी कुंचबणा होत आहे. निदान यावर्षी तरी
शासनाने शिक्षकांची वार्षिक निकालाची कामे पुर्ण होताच या शिक्षकांना त्यांच्या मुळ जिल्ह्यातील गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेनी केली आहे.
आॅनलाईन अध्यापन,परीक्षा,चार महिने आॅफलाईन शाळा, पुन्हा आॅनलाईन शिक्षण, वार्षिक निकाल व मुल्यमापन या नेहमीच्या कामकाजाबरोबरच
शिक्षकांनी कोवीड- १९ आपत्ती व्यवस्थापन काळात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा व पोलीसांबरोबर अनेक ठिकाणी विशेष म्हणजे कोणतेही प्रशिक्षण नसतानाही जीव धोक्यात घालून या यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून कामगिरी बजावली आहे.
गतवर्षी 22 मार्च 2020 पासून परजिल्ह्यातील बहुतांश शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी हे आपल्या मुळगावी जाऊ शकले नाहीत. दरम्यानच्या काळात
अनेकांचे जवळचे नातेवाईक ,मित्र निर्वतले तरी सुद्धा त्याची भेट घेता आली नाही.
लग्न समारंभ, आपल्या जीवाभावाच्या नातेवाईकांना त्यांना भेटता आलं नाही. यावर्षीतरी
तरी किमान 15 मे पासून 13 जूनपर्यंत परजिल्ह्यातील शिक्षकांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची परवानगी दिली जावी,अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर,सचिव सुरेश चौकेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर,संघटक समीर परब, राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण,महिला प्रतिनिधी सुष्मिता चव्हाण यांनी केली आहे.