विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची आचरा पोलिसांना सुचना
वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. कोरोना साखळी तोडण्यासाठी आचरा गावात घरोघरी जावून सर्वेक्षण करावे तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी, थर्मल स्क्रीनिंग, कोविड टेस्ट करण्याच्या सूचना आचरा आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी डॉ. शामराव जाधव यांना केल्या. आचरा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक उपनिरिक्षक कुलदिप पाटिल यांच्याशी चर्चा करत बाजारपेठेत, लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांना नागरिकांची गर्दी होऊ देऊ नका. विनाकरण फिरत असणाऱ्यांवर कारवाई करा अशा सूचना आ.वैभव नाईक यांनी दिल्या.
आचरा पिरावाडी येथील आशा सेविका रमिता करुणाधन जोशी यांच्या पतीचे निधन झाल्याने आमदार वैभव नाईक यांनी त्यांना शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत केली. तसेच राज्य शासनाकडूनही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आशास्वयंसेविकांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.आशा सेविकांना आवश्यक साहित्य व त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही आ. नाईक यांनी दिली. यावेळी त्यांनी आचरा आरोग्य केंद्रातील सोईसुविधा तसेच लसीकरणाच्या नियोजनाबाबतचा आढावा घेतला व आवश्यक सूचना केल्या.
यावेळी पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, आचरा उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, भाऊ परब, समीर हडकर, विनायक परब, जगदिश पांगे,अनुष्का गावकर, अनिल गांवकर, मिताली कोरगावकर, तलाठी श्री. काळे, आरोग्य सहाय्यक श्री. ठाकूर, आदी उपस्थित होते.