सिंधुदुर्गनगरी
कणकवली शहरात 14 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. सदर कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. मणेरी – बडमेवाडी येथे दिनांक 9 मे 2021 पर्यंत, कसई दोडामार्ग – हरिजन कॉलनी दिनांक 10 मे 2021 पर्यंत, कसई दोडामार्ग- केळीचे टेंब ,पाटये – पुनर्वसन येथे दिनांक 12 मे 2021 पर्यंत, कसई दोडामार्ग – वरची घाटवाडी, साटेली भेडशी-वरचा बाजार,साटेली भेडशी – जळकाटवाडी, साटेली भेडशी – कदमवाडी , पिकुळे -शाळेचीवाडी, कळणे- नुतनवाडी येथे दिनांक 13 मे 2021 पर्यंत, सरगवे – पुनर्वसन दोन ठिकाणी येथे दिनांक 14 मे 2021 पर्यंत , साटेली भेडशी – खौराटवाडी, पिकुळे-मधलीवाडी येथे दिनांक 15 मे2021 रोजी पर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आली आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.