वेंगुर्ला
करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सोसायटी फोर इंटिग्रेट रुलर डेव्हलपमेंट संस्थेच्यातर्फे प्राणजीवन सहयोगी संस्था यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व कंटेनमेंट झोनमध्ये सॅनिटायझर फवारणी व त्याचबरोबर नागरिकांचे समुपदेशन कार्यक्रम सिंधुदूर्ग जिल्ह्यात राबविला जात आहे. त्याचा वेंगुर्ला येथे तहसीलदार प्रवीण लोकरे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करोना योद्धा तहसीलदार प्रवीण लोकरे यांचा सत्कार केला.
यावेळी कार्यक्रम प्रमुख प्रकाश मेहता,सह प्रमुख प्रकाश गावडे, वेंगुर्ला तालुका प्रतिनिधी गीतेश शेणई व संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्राणजीवन सहयोगी संस्थेचे पंचेचाळीस जणांच्या एकत्रित टीम मधून प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील मालवण, कणकवली, दोडामार्ग या तालुक्यात गावावर फवारणी केली असून जिल्ह्यातील आठही तालुके येथील कंटेनमेंट झोन व गावावर शासकीय कार्यालय यामध्ये फवारणी केली जाणार असल्याची माहिती प्राणजीवन सहयोगी संस्था अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी दिली.