नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसंर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पीएमओ ऑफिसच्या माहितीनुसार पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये NEET-PG परीक्षा 4 महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
NEET PG 2021 परीक्षा 18 एप्रिल 2021ला आयोजित केली जाणार होती.
कोरोना विषाणू संसर्गामुळे ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. ही परीक्षा देशातील 6,102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. केंद्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत.